पंढरपुरातून चारशे धारकरी शिवभक्त रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरिता निघाले....

पंढरपूर प्रतिनिधी--- 
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रीक्षेत्र रायगड येथे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमानिमित्त पंढरपुरातून 400 धारकरी शिवभक्तांची दिंडी श्री शिव समाधीला नतमस्तक होणार 51 पखवाज व डब्बा तबला यांची मानवंदना देण्यासाठी बाल शिवभक्त राजसद्रेवर मानवंदना देणार त्याचबरोबर होळीच्या माळावर मर्दानी खेळाचे अनोखे प्रात्यक्षिक होऊन पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर स्मृतींना अभिवादन करणार त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे व देशभक्तीपर गीते सेक्स फोन संगीत वादनाने मानवंदना देणार 40 वर्ष ची परंपरा जपणारे श्रीक्षेत्र पंढरपूर आतील शिवभक्त प्रतिष्ठान अनोख्या पद्धतीने पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना कार्यक्रमात दरवर्षी हजर असेल अनेक वीरश्रीने नटलेल्या लाठीकाठी दानपट्टा अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करीत असतात पंढरपुरातील अनेक शिवभक्तांच्या मदतीशिवाय हा पुण्यस्मृती अभिवादन कार्यक्रम होणे शक्य नसून पंढरपुरातील अनेक शिवभक्त यासाठी पुन्हा फुलाची पाकळी मदत करतात 2018 चा शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कारही या संस्थेत मिळाला असून अविरत गड स्वच्छता वृक्षारोपण गडकोट किल्ल्यांचे संवर्धन दर्शनी फलक व्यवस्था असे अनेक उपक्रम शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतात

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form