मोदी कि गॅरंटी फसवी असून जनतेने त्यांचा भुलथापास बळी पडून नये...
भाजपाने राम मंदिर उभा केले असे ते सारखे म्हणत आहेत.परंतु श्रीराम सर्वसामान्यांच्या मनामध्ये,नसा नसा मध्ये आहे. रामाचा वापर भाजपाने राजकारणासाठी केला.आम्ही तसा वापर कधी केलेला नाही. मोदी कि गॅरंटीचे काही खरे नाही ती फसवी आहे असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आज पंढरपूर येथे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलताना म्हणाले.
पुढे बोलत असताना ते म्हणाले गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा सरकारने फक्त आश्वासन देण्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेले नाही. बेरोजगारी,शेतकरी,
कष्टकरी,व्यापारी,उद्योजक, महिला, युवा युवती यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी योग्य उपाययोजना केल्या नाहीत.उलट जीसटीचे भुत मानगुटीवर बसविले.
या वार्तालाप कार्यक्रमात प्रत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की,महागाई, गॅस,पेट्रोलचे दर यामुळे सर्व सामान्य जनतेचे कौटुंबिक समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही,शेतकरी कर्जबाजारी झाला सहकार चळवळ मोडीत काढली कारखानादारी अडचणी आणली.हिच का मोदी गॅरंटी म्हणत त्यांनी या मोदी सरकारचे व मोदीची गॅरंटी ही फक्त फसवी असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने राजकीय फायद्यासाठी व सुडबुध्दीने विरोधकांच्या मागे चौकशीचे सत्र सुरू ठेवून ईडी,सीबीआय,आयकर विभागा या सरकारी यंत्रणेला या विरोधकाच्या मागे लावून त्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न केले. व आपल्या पक्षांमध्ये सामील करून घेतले. कुठलेच घोटाळे किंवा आरोप सरकार उघडकीस आणू शकले नाहीत.आशा घटना लोकशाहीला अभिप्रेत नाही.लोकशाहीला मारक ठरेल असे वर्तन या भाजपा सरकारचे आहे.हे भारतातील लोकशाहीला घातक आहे असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही जागेसाठी सोलापूर जिल्ह्यातील विजयसिंह मोहिते पाटील आणि मी व शरद पवार हे तिघे एकत्र आल्यामुळे भाजपाची झोप उडालीआहे.
त्यांनी आता फोडाफोडीचे राजकारण सुरू केलेले आहे.आता कार्यकर्त्यांची व नेते
मंडळीची पळवा पळवी भाजपा करीत आहे. हे भाजपाला आता समजून चुकले आहे की आपला पराभव अटळ आहे. म्हणूनच असे हे पळवा पळवीचे राजकारण भाजपा सरकार करत आहे.असे सुशील कुमार शिंदे यांनी वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Tags
राजकीय वार्ता