इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या सोबत भगिरथ भालके...

पंढरपूर  प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे व काँग्रेस आयचे उमेदवार प्रणिती  शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातुन प्रचंड मताने विजय करण्याचा निर्धार आम्ही करीत आहोत अशी घोषणा भगिरथ भालके यांनी आज केली.

सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती  शिंदे यांना प्रचंड मताने निवडून देणार आहोत. आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत असे प्रतिपादन भगीरथ भालके यांनी आज रोजी केले. 
      
कै. भारत नाना भालके यांचा हा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे .या मतदार संघात भारत भालके यांनी तीन वेळा  प्रतिनिधित्व केलेले होते. एक वेळ त्यांनी आय काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याशी धनिष्ठ संबंध असल्यामुळे आणि शिंदे कुटुंबाशी ऋणानुबंध असल्यामुळे त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिती  शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा परिसरातून भरघोस मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.भगिरथ भालके यांच्या सहकार्याने प्रणिती शिंदे यांचा विजय सुखकर होणार असे सध्या तरी चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form