सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातुपुते यांना मनसे प्राणपणाने सहकार्य करणार -- सो. लो. मनसे अध्यक्ष प्रशांत इंगळे

राम सातपुतेंसाठी सक्षम बुथ यंत्रणा राबवणार :मनसे नेते प्रशांत इंगळे
सोलापूर प्रतिनिधी --
सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातुपुते यांना मनसे राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशा प्रमाणे सहकार्य करेल मात्र मनसेला महापालिकेत भाजपने संधी द्यावी असे मनसे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत हगळे यांनी सांगीतले.

 ही अट मैत्रीपूर्ण असून मनसेची यंत्रणा महायुतीमध्ये महत्वाची भूमीका बजावेल मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला पाठींबा दिल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते महायुती उमेदवारासाठी प्राणपणाने प्रचार करतील. सोलापूरात युवकांमध्ये राजसाहेब ठाकरे यांची लोकप्रीयता असून विकासाच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन मनसेने केली आहेत. यामुळे महायुतीचे उमेद्वार राम सातपुते यांना मनसेला मानर्णाया मतदारांचा पाठींबा मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सोलापूर

मनसेचा कार्यकर्ता हा स्वाभीमानाचा भुकेला असून महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणणार असे लोकसभा अध्यक्ष प्रशांत ईंगळे यांनी सांगीतले. सोलापुरात विकासाच्या अनेक प्रश्नांवर मनसेने आंदोलने करून नागरीकांचे प्रश्न तडीस नेले आहेत. त्यामुळे मनसेला मानणारा मोठा वर्ग सोलापूर लोकसभा क्षेत्रात आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठींबा दिला आहे. सोलापूरचे उमेद्वार राम सातपुते यांना सोलापुरातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सहकार्य करतील. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा प्रशांत ईंगळे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form