रिक्षाचालकांना मोफत पी.यु.सी.
तपासणी व प्रमाणपत्र वाटप समारंभ संपन्न....
पंढरपूर प्रतिनिधी---
लायन्स क्लब, पंढरपूर राजवीर राजलक्ष्मी बहुद्देशीय समाजसेवी चॅरिटेबल ट्रस्ट, पंढरपूर जन सेवा हिच ईश्वर सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा या उपक्रमानिमित्ताने पंढरपूर येथील रिक्षा चालकांना रिक्षाची मोफत पी. यु. सी. तपासणी व सर्टिफिकेट वाटप समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी ला. राजेंद्र शहा ला.चंद्रकांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला ला.आरती बसवंती (अध्यक्ष), ला. ओंकार बसवंती,ला. शोभा गुप्ता ला. रा. पां. कटेकर ला. विवेक परदेशी,ला. कैलास करंडे, ला. डॉ. सुजाता गुंडेवार, ला. मुन्नार गोसावी, ला. सतीश निपाणकर,ला. मृणाल गांधी,ला. ऋजुता उत्पात,ला सुमित कदम, ला. डॉ. शितल फडे व राजवीर बसवंती आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम रविवार दि. १० मार्च रोजी प्रणव मोटार ड्रायव्हिंग स्कुल, पी.यु.सी. सेंटर, बायपास रोड, केबीपी कॉलेज चौक, पंढरपूर येथे संपन्न झाला.
Tags
सामाजिक वार्ता