महिला दिनानिमित्त वीरशैव लिंगायत समाजावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ. अजितराव गोपछडे यांच्या समाजाच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलाचा अंबिका पालघंटे, डॉ. पटणे अशा दहा महिलांचा सन्मान सोहळा सोलापूर बीजेपी मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ स्वाती रमेश गेंड यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य आशीर्वाद लाभले,भारतीय जनता पार्टीच्या सोलापूरचे माजी महापौर श्रीमती बनशेट्टी, राजेंद्र चाकोते तसेच प्रसिद्ध व्याख्याते श्रीयुत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी भाजप ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष महिला श्रीमती सुचित्रा थळंगे व उपाध्यक्ष हणमगाव तसेच अनेक महिलांनी परिश्रम घेतले.
Tags
सामाजिक वार्ता