वेणुनगर प्रतिनिधी ---
वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतज्ञाबा पाटील यांचे नेतृत्वाखाली दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी चालू होऊन १३४ दिवसामध्ये १० लाख मे. टनाचे गाळप करुन बी हेवी मोलेसेसमधील साखरेची घट गृहीत धरुन सरासरी १०.१० टक्के उताप्याने १०,२१,००० क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याचे आजपर्यतच्या इतिहासात १३४ दिवसामध्ये १० लाख गाळप होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
१० लाख मे.टन गाळप झाल्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी साखर अर्पण
कारखान्याचे सन २०२३-२४ हंगामामध्ये कमी कालावधीत १३४ दिवसामध्ये विक्रमी १० लाख मे. टनाचे गाळप केले त्याबद्दल कारखान्याचेसंचालक मंडळातील संचालक, कार्यकारी संचालक व कर्मचारी यांचेकडून स.११.०० वा. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी साखर अर्पण करून श्री विठ्ठल मंदिरातील भाविक भक्तांना प्रसाद म्हणून साखरेचे बाटप केले व श्री विठ्ठलाच्या दैनंदिन नित्यपोचार नैवेदयासाठी मंदिर समितीस साखर देण्यात आली. श्री विठ्ठलाच्या चरणी साखर अर्पण करून कारखान्याचा नावलौकीक होवून प्रगती होवो अशी प्रार्थना केली.
पखालपूर येथील श्री गणेशाच्या चरणी साखर अर्पण
आपल्या कारखान्याच्या प्रयेप्रमाणे गळीत हंगाम सुरुवातीस उत्पादित झालेली पहिली साखर श्री गणेशाच्या चरणी अर्पण करतो परंतु बावधी कमी कालावधीमध्ये १० लाख मे. टनाचे विक्रमी गाळप झाल्याने पखानपूर येथील श्री गणेशाच्या चरणी संचालक व कर्मचारी यांचे हस्ते साखर अर्पण करण्यात आली.
कामगारांच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते साखर पोत्याचे पूजन
कारखान्याने १० लाख मे.टन गाळपाच्या त्याच दिवशी १०,२१,००० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असल्याने १०,२१,००० क्विंटन साखर पोत्याचे कमी कालावधीत उत्पादन केलेमुळे मा. संचालक मंडळाने कामगारांमध्ये नवीन उत्साह निर्माण होणेसाठी व त्यांच्या कुटुंबामध्ये कारखान्याविषयी असलेली आस्था अधिक वृध्दीगत होणेसाठी कारखान्याचे पाच कर्मचाऱ्यांच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते साखर पोत्याचे विधीवत पूजन करण्यात आले.
अधिकारी-कर्मचारी व कामगारांना मिठाई व पुष्पगुच्छ देवून सन्मान श्री अभिजीतज्ञाबा पाटील व संचालक मंडळाने कष्टकरी शेतकऱ्यांच्या विश्वासावर कर्मचान्यांच्या
कारखान्याचे चेअरमन कष्टाने व तोडणी बाहतूक ठेकेदार यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे तसेच अधिकारी यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे ब कार्यकारी संभालक ते कामगार यांनी आपली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडल्यामुळे आज कारखान्याने १० लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा पार केलेला आहे. याबद्दल सर्व कर्मचारी यांचे चेअरमन साहेब व संचालक मंडळाचे हस्ते सत्कार करण्यात येवून मिठाईचे वाटप करण्यात आले.
सभासद, बिगर सभासद ऊस उत्पादक शेतक-यांचे ऊसाचे गाळप पुर्ण होईपर्यंत गळीत हंगाम चालू ठेवणार
आपल्या कार्यक्षेत्रातील, कार्यक्षेत्राबाहेरील व जिल्हयाच्या आसपासचे गावातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपा बिना शिल्लक राहू नये व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी आपला कारखाना दि.११.०३.२०२४ अखेर किंवा जोपर्यंत कारखाना कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रालगत ऊस उत्पादक सभासद / बिगर सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप होणार नाही तोपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. तरी ज्या शेतकयांचा परिपक्व ऊस गाळपाविना शेतामध्ये उभा आहे. अशा शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क साधवा.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड म्हणाले की, सन २०१४-१५ नंतर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संकटांना तोड देत कारखान्याने १० लाख मे. टनाचे विक्रमी गाळप अल्पावधीत केले आहे, याबद्दल सर्व सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, ऊस तोडणी बाहतुक ठेकेदार व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्याबद्दल सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील म्हणाले की, कारखान्याचे गाळप क्षमतेनुसार कारखाना बशस्वीरित्या सुरु आहे. शेतक-यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आजचा हा सोनेरी दिवस उशवला आहे. या विश्वासाला भविष्यकाळात पात्र राहण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही दिलेल्या शब्दांचे पालन केलेले आहे व येथून पुढेही पालन करू. ज्या शेतकऱ्यांचा ऊस मार्च महिन्यात गळीतास बेईल त्या शेतकऱ्यांना हंगाम सुरवातीस जाहीर केलेनुसार एकत्रित रु.३०००/- दर देण्यात येईल. तरी आपला गळीताविना शेतामध्ये उभा असलेला उस श्री विठ्ठल सह. साखर कारखान्यास दयावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ठेकेदार, कामगार व हितचिंतक यांनी आतापर्यंत गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाहणेस सहकार्य केलेले आहे, यापुढेही असेच सहकार्य करावे, असे ते म्हणाले, सध्या पंढरपूर तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, हितचिंतक यांच्यात कारखाना यशस्वीपणे चालू असल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री दत्तात्रय नरसाळे, तुकाराम मस्के, कारखान्याचे कर्मचारी बंडु पाटील, अनिल भोसले, सर्जेराव पवार यांनी जापले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन बाघाटे, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, उमेश मोरे, धनाजी खरात, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सहकार वार्ता