पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ३५० सफाई कर्मचारी व इतर १५० कर्मचाऱ्यांना दिला १० लाखाचा पोस्टल अपघाती विमा योजनेचा लाभ...

पंढरपूर प्रतिनिधी --
मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या बाबत सोलापूर जिल्ह्या समन्वय समितीचे राज्याचे अध्यक्ष अँड .सुनील वाळुजकर,जिल्हाध्यक्ष कॉ . सिद्धाप्पा कलशेट्टी यांचे शिष्ट मंडळसोबत चर्चा केली होती त्यावेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा विमा उतरण्यात यावा अशा सूचना सर्व मुख्याधिकारी यांना दिल्या होत्या 

त्यानुसार पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना (इंटक) व समन्वय समिती च्या वतीने  ३५० सफाई कर्मचारी व इतर १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रुपये १० लाखाचा अपघाती पोस्टल विमा उतरविण्या ची मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी अँड.सुनिल वाळूजकर, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष धनंजय वाघमारे, संतोष सर्वगोड,जयंत पवार यांनी मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्याकडे केली होती यास मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव  व प्रशासक सचिन इथापे  यांनी १० लाखाचा पोस्टल विमा उतरण्याबाबत मंजुरी दिली असून  पंढरपूर पोस्ट विभागाचे अधिक्षक सी. बी. भोर,IPPB MANAGER,
विनायक पासंगराव,विपणन अधिकारी विष्णु कांदे यांना नगर परिषदेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांचा पोस्टल विमा उतरण्याबाबत लेखी पत्र मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव,  कामगार संघटनेचे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनिल वाळूजकरआरोग्य अधिकारी शरद वाघमारे,नागनाथ तोडकर यांचे हस्ते देण्यात आले प्रति कर्मचारी रू.499/- प्रमाणे रू दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च नगरपरिषद च्या वतीने देण्यात येणार आहे आज नगरपालिका सभागृहांमध्ये पोस्टल विमा उतरण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form