मंगळवेढा प्रतिनिधी---
मंगळवेढा वकील संघाचे सदस्य व मौजे लक्ष्मीदहिवडी, ता.मंगळवेढा येथील रहिवासी ॲड.राजू कुलकर्णी यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी निवड झाली आहे.
ॲड. राजू कुलकर्णी हे गेल्या २० ते २५ वर्षापासून मंगळवेढा तालुका न्यायालय व पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात वकिली करत असून यापूर्वी त्यांनी मंगळवेढा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच मंगळवेढा येथील सध्याच्या न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल मौजे लक्ष्मीदहिवडी येथे मारुती जुंदळे,मनोहर पाटील,राजाभाऊ कोष्टी,नागेश कस्तुरे,आर.पी. जुंदळे,पप्पू स्वामी,संदीप गयाळी,सचिन मेनकुदळे,वैभव कुंभार,अवधूत घोडके,लाला सोनवले,
सोमनाथ पाटील, तुळशीराम कडलासकर, अंबादास विटकर,सुरेश पुजारी,संजय कांबळे,नागेश गुरव,संकेत बनसोडे,दत्ता सोनवले,मस्कू कुपाडे आदींनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांना सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून कौतुक केले जात आहे.
Tags
सामाजिक वार्ता