चळे येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रम तृप्तीताई खरे यांच्या उपस्थित संपन्न...


पंढरपूर प्रतिनिधी ---
चळे येथे २४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या सौभाग्यवती तृप्तीताई खरे यांच्या उपस्थित चळे येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

चळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री दर्लिंग प्रशाला व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन  समाजसेविका तृप्ती ताई खरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालन ज्ञानेश्वर शिखरे, यांनी भूषवले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भुसे यांनी केले.

यावेळी बोलताना प्रथम त्यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, सर्व क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करत आहेत. आज  जगात महिला कुठे कमी नाहीत.  डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस, एसटी ड्रायव्हर कंडक्टर, राजकीय तसेच प्रशासकीय सेवेत  मोठमोठ्या पदावर महिला काम करत आहेत. त्यामुळे महिलांनी स्वतःला कमी समजू नये प्रत्येक महिलानी आपल्या कर्तृत्ववाने ध्येय साध्य करावे असतेच त्यांनी आपल्या कलागुणाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी फक्त एक सुसंस्कृत व हक्काचे व्यासपीठ तयार करावे मुलींनी ही चांगले शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावे कारण म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी आपला अभ्यास वेळेत पूर्ण करावा आणि चांगली मार्क मिळावेत असे ते म्हणाले.
 
 या कार्यक्रमास प्राचार्य जे. बी. गायकवाड, गोपाळपूरच्या उपसरपंच उज्वलाताई
बनसोडे, मा.सरपंच वंदना सोनटक्के, जिजाऊ ग्रामीण महिला पतसंस्थेच्या चेअरमन चंद्रभागा घाडगे, सारिका वाघ, दिपाली गायकवाड, अबिनी वाघ, डॉ. वैशाली गायकवाड, स्मृति मोरे, पुनम मोरे, आर पीआय कार्याध्यक्ष विजय वाघमारे, ज्ञानेश्वर शिखरे, लखन वाघमारे विद्यार्थी आणि महिला शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form