चेअरमन हरिष दादा गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनीचा सन्मान व सत्कार...
पंढरपूर प्रतिनिधी ---
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा मंडळाच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर व श्री दलिंग विद्यामंदिर भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयचे संस्थापक अध्यक्ष हरीश दादा गायकवाड हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
यावेळी हरिष दादा गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते बंडू मोरे यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आयोजक राजेंद्र फुगारे यांनी आपल्या मनोगत मध्ये वुमन फिट तो इंडिया फिट चालल्याने पळण्याने आरोग्य सुधारते म्हणून हा विद्यार्थिनींसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होते असे म्हणाले जागतिक महिला दिनानिमित्त नेहरू युवा मंडळाच्या वतीने हा मोलाचा संदेश देण्यात आला.नेहरू युवा मंडळच्या वतीने प्रथम द्वितीय तृतीय प्रशस्त प्रमाणपत्र टी-शर्ट टोपी व कप असे बक्षीस आयोजकांच्या वतीने वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींना सहभाग घेतलेल्या प्रशस्त प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सोसायटी नंबर दोनचे चेअरमन श्रीनिवास बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बंडू मोरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, गणेश दांडगे, हनुमंत पाटील, रमेश वाघ, नेहरू मंडळाचे अध्यक्ष राहुल नागणे, आप्पासो दांडगे, प्राचार्य जे बी गायकवाड सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते,सूत्र संचलन मोहिते यांनी केले.तर आभार तुकाराम भोसले यांनी मांडले.सदर कार्यक्रमचे आयोजन नेहरू युवा मंडळ राजेंद्र फुगारे यांनी केले होत.
Tags
सामाजिक वार्ता