तृप्तीताई खरे यांच्या गावभेटीस महिलांचा उदंड प्रतिसाद

चळे येथील हळदी कुंकू कार्यक्रमासाठी शेकडो महिलांची उपस्थिती
पंढरपूर प्रतिनीधी--
२४७ मोहोळ राखीव मतदारसंघातील संभाव्य खरे  यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे  यांनीही मोहोळ मतदार संघात आपला गावभेट दौरा सुरू ठेवला आहे . यासाठी महिला मधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसात चळे आणि ओझेवाडी येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी शेकडो महिलांनी आपली उपस्थिती दाखविली आहे.
   मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघातून इच्छुक असलेले उमेदवार उद्योजक राजू खरे यांनीही  आपला संपर्क दौरा  वाढवण्यास मोठा जोर धरला आहे. विविध कार्यक्रम आणि विविध प्रकारची मदत करण्याच्या निमित्ताने राजू खरे गावोगावी संपर्क वाढला आहे. 
 उद्योजक राजू खरे , पत्नी तृप्तीताई खरे, आणि त्यांचे लहान बंधू विजय खरे यांनी आपले गाव भेटीसाठी दौरे वाढवले आहेत. यामुळे राजू खरे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे.
 मागील काही दिवसापासून हळदी कुंकू कार्यक्रम सुरू केले आहेत. यामध्ये मोहोळ मतदारसंघातील असलेल्या चळे ता. पंढरपूर येथे संत बाळूमामा मंदिर चळे. बरड वस्ती येथे महिलाशी संवाद साधत अतिशय मोठा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. तृप्तीताई खरे यांचा सत्कार चळे ग्रामपंचायतचे वतीने सरपंच अनिता हिरालाल सरिक यांच्या हस्ते करण्यात आला. 
संत बाळूमामा मंदिर चळे. बरड वस्ती, येथे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती . यावेळी कांतीलाल महाराज सरिक, विजय खरे, पांडुरंग डोंगरे, पांडुरंग परकाळे, औदुंबर पाटील ,चिंतामणी बनसोडे, डॉ रूषी वाघ, प्रवीण घाडगे ,दादा सरिक, नितीन हेगडकर, नागेश सरिक, विजय आदतराव, आचारी, शरद वगरे, उज्वलाताई  अरुण बनसोडे संध्याराणी चिंतामणी बनसोडे, रतन गणेश वाघ अर्चना दत्तात्रय वाघ, गौरी शरद वगरे, राणी नितीन हेगडकर, कोमल वैभव वाडेकर, जयश्री कांतीलाल सरिक, जयश्री औदुंबर शिंदे, पूजा पोपट फराटे, सखुबाई वसंत घाडगे, शोभा ज्ञानेश्वर खांडेकर, गीतांजली उमेश जाधव, सुरेखा अर्जुन वाघ, सुवर्णा महादेव हेगडकर, सुवर्णा आबा शिखरे,  अश्विनी सुधाकर बनसोडे यांचेसह ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form