पंढरपूर प्रतिनिधी --
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप नवीन चेहऱ्याचा शोध घेत आहे. या
पार्श्वभूमीवर आपण भाजपात प्रवेश करणार असून कमळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती उत्तम जानकर यांनी दिली.
उत्तम जानकर पंढरपुरात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. यंदा भाजपने महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे प्रत्येक मतदारसंघात पाहणी व निरीक्षण करून उमेदवार ठरविण्यात येत आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे म्हणावे तसे काम व मतदारांशी संपर्क नसल्याने भाजपने यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरविले आहे.
यामुळे या मतदार संघात अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. उत्तम जानकर यांनी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. पहिल्यापासून आमचे घराणे भाजपचे आहे. यामुळे ही निवडणूक लढविण्यास काही अडचण येणार नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे याचा फायदा निवडणुकीत होणार आहे. आता भाजप कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.
Tags
राजकीय वार्ता