श्री विठ्ठल कारखान्यावर माघी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी फराळ वाटप

वेणुनगर, दि.२०- 
बेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माघी यात्रेनिमित्त भाविकांसाठी फराळ वाटपाचे नियोजन करण्यात आले.

अमन मंगळवार दि.२०.०२.२०२४ रोजी माघवारी (जया एकादशीचे) औचित्य साधून कारखान्याच्या मेनगेटजवळ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविक भक्तांना कारखान्याच्या वतीने खिचडी व केळींचे वाटप धारशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री अमर पाटील, श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, बाळासाहेब हाके, नवनाथ नाईकनवरे, जनक भोसले, सचिन बाघाटे, अशोक तोंडले, दशरथ जाधव निमंत्रित संचालक अंगद चिखलकर आदि संचालक व कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर, गायकवाड यांचेसह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले.

श्री विठ्ठल कारखान्याच्या वतीने एकादशी निमित्त भाविक भक्तांना फराळ वाटपाची परंपरा चालु ठेवल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील व नगर, बीड, करमाळा, टेंभूर्णी या भागातून येणाऱ्या भाविक भक्तांनी फराळाचा आस्वाद घेऊन कारखान्याचे संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form