पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर येथील सुवर्णपंढरी पांचाळ सुवर्णकार समाज संघटनेचे सहसचिव पंढरपूर येथील समाजसेवक युवा नेतृत्व करणारे सारंग हेमंतकुमार महामुनी यांची महाराष्ट्राचे दमदार उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने सारंग महामुनी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
पंढरपूर येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात युवा समाजसेवक म्हणून त्यांची ओळख असुन याच कामाची देखल घेऊन त्यांची
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या नेमणूकीमुळे सुवर्णपंढरी पांचाळ सुवर्णकार समाज संघटना पंढरपूर तसेच त्यांना सर्व स्तरातील लोकांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
राजकीय वार्ता