पढरपूर प्रतिनिधी---
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची नुकतीच प्रशासनाकडून बदली करण्यात आली आहे. यामध्ये पंढरपूर शहराच्या प्रांताधिकारी पदी महसूल प्रशासनाचा दांडगा अभ्यास असलेले नूतन उपविभागीय अधिकारी म्हणून सचिन सुरेश इथापे यांची नियुक्ती झालेली आहे.
त्यांनी शासकीय सेवेमध्ये आपली सुरुवात 26 नोव्हेंबर 2002 पासून केली असून तहसीलदार म्हणून खानापूर विटा जि.सांगली,माण जि. सातारा,भोर जि.पुणे, बारामती जि. पुणे त्यांच्या कामाची जबाबदारी,व कर्तव्ये दक्ष अधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती करण्यात आली व त्यांना उपजिल्हाधिकारी (महसूल) सांगली, उपविभागीय अधिकारी विटा, उपविभागीय अधिकारी करवीर, जि. कोल्हापूर येथे कार्य केले. यानंतर त्यांना उपमहाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळावर नियुक्ती करण्यात आली, उपआयुक्त, पुणे महानगरपालिका येथे कार्यरत होते.
अशा विविध पदावरील कामाचा त्यानां दांडगा अनुभव असलेल्या कार्यरत अधिकारी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होत आहेत.
