माढा तालुक्यातील दोन्ही आमदार शिंदे बंधूंनी मराठा समाजाची बाजू तसेच सगे सोयरे या अध्यदेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आवाज उठवणार"
पंढरपूर ( प्रतिनिधी)
मराठा सकल समाजाच्या यांच्या वतीने माढा तालुक्यामध्ये आज रोजी मराठा समाज यांच्या वतीने आमदार बबनदादा शिंदे तसेच त्यांचे बंधू संजय मामा शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे तसेच करमाळ्याचे आमदार संजय भाऊ शिंदे या दोन्ही आमदारांना सकल मराठा समाज वतीने निवेदन देऊन मराठा समाजा साठी जे 26 जानेवारी रोजी आरक्षणासंदर्भात जो अध्यादेश निघालेला आहे. त्या अध्यादेशामध्ये सगेसोयरे हा शब्द नमूद केलेला आहे. तरी या सगेसोयरे या अध्यादेशातील शब्दाला येत्या वीस तारखेला महाराष्ट्र सरकारने खास अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सगे सोयरे हा शब्द नमूद केलेला आहे. तरी सगे सोयरे या अध्यदेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आवाज उठवावा म्हणून माढा तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे तसेच त्यांचे बंधू संजय भाऊ शिंदे यांना ठिय्या आंदोलन करून निवेदनाद्वारे तसेच चर्चा करून सांगण्यात आले.
माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे तसेच करमाळा तालुक्याचे आमदार संजय भाऊ शिंदे या दोघा बंधूंनी मराठा समाजाची बाजू अधिवेशनामध्ये मांडू तसेच सगेसोयरे या अध्यादेशातील शब्दाप्रमाणे कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार मराठा समाजासाठी आवाज उठवणार असे बबनदादा शिंदे तसेच संजय भाऊ शिंदे या दोन्ही आमदार बंधूंनी आज रोजी माढा तालुका मराठा सकल समाज माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांना व मराठा समाज बांधवांना त्यांनी आश्वासन दिले. व उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही आवाज उठवू असे त्यांनी म्हटले.
याप्रसंगी संजय टोणपे, सचिन जगताप, तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे, सौदागर जाधव, प्रशांत गीड्डे' व्यंकटेश पाटील, सुरेश बागल, प्राध्यापक दीपक पाटील, दत्तात्रय काकडे, बाबासाहेब गवळी, मच्छिंद्र कदम, वाहिद शेख ,रेवण ढवळे पाटील, गणेश व्यवहारे, अजय गायकवाड, विजय काळे, विक्रम परबत इत्यादी कार्यकर्ते या आंदोलनात सामील होते.
Tags
सामाजिक वार्ता