जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री वसंतराव पोतदार, आलूरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित...

सोलापूर प्रतिनिधी --
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात सोनार समाज भूषण सुवर्ण रत्न, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव बळीराम पोतदार आलूरकर यांना राष्ट्रीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि लक्षवेधी कामगिरी व योगदानाबद्दल अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विध्यमाने  राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे विध्यमान प्रांतपाल  ला. भोजराज .  नाईक निंबाळकर, अध्यक्ष  ला. ईश्वर झुंजा, अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ चे अध्यक्ष  ला. अभिजीत भांजे, संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती श्री ला. अशोक भांजे, यांचे प्रमुख उपस्थितीत माजी प्रांतपाल मा. कापसे साहेब  यांचे हस्ते प्रदान करून सन्मानित  करण्यात आले. 
जेष्ठ सेनानी वसंतराव पोतदार आलूरकर यांचे वय वर्षे 95 असून आजही ते सामाजिक कार्यात कार्यरत असून  रामलिंग मुदगड तालुका निलंगा येथील संत देवाजी बुवा धर्माधिकारी समाधी मंदिर ट्रस्टचे  सचिव आहेत. त्यांचे हैद्राबाद मुक्ती आंदोलनातील योगदान लक्षवेधी असून आजही ते काम अगदी मनापासून करतात. समाज कार्यासाठी कोणतीही पदवी लागत नाही, खरं तर आपला समाज हा आपल्या घरापासून सुरू होतो, समाज परिवर्तनासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असेल तर ते स्वतः पासून आधी करायला हवेत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या कार्याची माहिती वाचून आपल्याला निश्चित च प्रेरणा मिळेल.
      
थोर  स्वातंत्र्यसेनानी,लोकसेवक  वसंतराव बळीराम पोतदार आलूरकर यांची  स्वातंत्र्य लढ्यातील वेधक कहाणी आपण पाहणार आहोत . तो काळच राष्ट्रभक्ती नि स्वातंत्र्याच्या वेडाने पछाडलेला अर्थात मंतरलेला काळ होता.  मनामनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतलेले होते .अशातच सन १९२७ रोजी आलूर या गावात तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे जन्मलेले वसंतराव बळीराम पोतदार हे होत. 
        आपण. जगतो ,काम करतो ,ज्या देशात राहतो त्या सर्व  लोकांवर अलोट प्रेम असलेला हा ध्येयवेडा तरुण !  तो धाडसी होता . अभ्यासू होता .  निरीक्षण उत्तम होते .  शिबिरातील सैनिक आणि निजाम संस्थांनातून  आलेल्या निर्वासितांच्या जेवणाची सोय यांच्याकडे होती . त्यांच्या आहाराबरोबर आरोग्याची काळजीही हा तरुण घेत असत .सोलापूर ,गुलबर्गा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील लढावू कॅम्पमध्ये यांचे कार्य अखंडित चालायचे . 
केसरजवळगा  , आलूर वागदरी ,घोळसगाव, हिरोळी सरसंबा इत्यादी गावे उस्मानाबाद ,सोलापूर जिल्ह्यात होती . त्या  गावातील कॅम्पमधील सैनिकांना  
विश्वंभरदादा हराळकर , देवेंद्र कासार,बाबासाहेब परांजपे , निलप्पा आण्णा बोलदे, मा र्तंडराव डांगे, आण्णाराव पाटील इत्यादी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेऊन त्या त्या भागातील कँपाना भेटी देत असत  . यानंतर अंदाज घेऊन हत्यारे पुरवण्याचे जिकिरीचे कार्य पार पाडत असत . स्वतःचा जीव धोक्यात घालून भारत स्वतंत्र होऊन सुद्धा या स्वातंत्र्य विराना स्वकियांच्या स्वातंत्र्यासाठी चोरी, छुपे काम करावे लागले . अनेक अखंड प्रयत्नानंतर ,अनेकांच्या बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळाले . मराठवाडा मुक्ती संग्राम हा सहज लढा नव्हता .  श्री वसंतराव बळीराम पोतदार आणि त्यांच्या साथीदारांनी खूप कार्य केले . या शूर वीरांच्या अथक कार्यातून आपण स्वतंत्र झालो . त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!.
       महाराष्ट्र शासनाने  सन्मान पत्र देऊन गौरव केला आणि पेन्शनही देऊ केली आहे . अशा या जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव बळीराम पोतदार यांचा आम्हां सोनार समाजास रास्त अभिमान वाटतो. त्यांना परमेश्वराने निरामय आयुष्य द्यावे व ते शतायुषी व्हावेत, सर्व सुख समाधाना चा वर्षाव करावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.
   
शब्दांकन   
  वसंत रामचंद्र पोतदार
        सोलापूर
        9423065915

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form