पंढरपूर प्रतिनिधी ---
आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या समाधी दिन सोहळा निमित्त श्री संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी मंदिर महाव्दार पंढरपूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी
मंगळवार सकाळी ०६-०० ते ०८-०० श्री संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी महापुजा - शुभहस्ते:- अध्यक्ष शामप्रसाद बेगमपुरे (सातारा)
सकाळी ०८-०० ते ०९-०० वेदपठण, सुश्राव्य मधूर वाणीतून :- वेदमूर्ती सदानंद चंद्रकांत महामुनी भटजी,चि. सुयश सदानंद महामुनी भटजी, सुदर्शन पंडित भटजी
सकाळी १०-०० ते १२-०० किर्तन व पुष्पवृष्टी... किर्तनकार:- ह.भ.प. श्री. हरी नामदास महाराज (श्री नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज)
दुपारी ०१-०० ते ०३-०० वाजेपर्यंत:- महाप्रसाद
दुपारी ०४-०० ते ०६-०० वाजेपर्यंत:- वार्षिक सर्वसाधारण सभा
सायंकाळी ०६-०० ते १०-०० वा. संगीत भजन व सोंगी भारूड, भारूडकार:- नामांकित व प्रसिध्द भारूडकार ह.भ.प. बालाजी शिरसट .
तर दिनांक २८ फेब्रुवारी
रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी मंदिर ट्रस्ट महाव्दार पंढरपूर येथे भजन,किर्तन, भारूड व काल्यांचे किर्तन आणि २८-०२-२०२४ रोजी दुपारी ४ वा भव्यदिव्य श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना व स्थानिक समाज बांधवांना कळविण्यात येते की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
सदर पालखी महाव्दार प्रदिक्षणा मार्गावरून म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर ते श्री संत शिरोमणी नरहरी महाराज चौक-कालिका देवी मंदिर चौक-काळा मारूती-चौफाळा- गांधी रोड - नाथचौक - तांबडा मारूती - दत्त घाट ते श्री संत शिरोमणी नरहरी महाराज चौक व श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
आपल्या पर्यंत पत्रिका पोहोचली असेल नसेल तरीही आपण हेच आमंत्रण समजुन श्री संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी दिन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
सामाजिक वार्ता