पंढरपूर प्रतिनिधी --
केंद्रीय रेल्वे विभागातील मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीच्या संचालकपदी पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथील मध्य रेल्वेच्या कार्यालयात जाऊन प्रणव परिचारक यांनी संचालकपदाची कर्तव्यसूत्र हाती घेतली. त्यानंतर त्यांनी मध्य रेलचे उप महाप्रबंधक अभय मिश्रा यांची भेट घेऊन महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील राज्यांमध्ये विस्तार असणाऱ्या या समि तीच्या कारभाराची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी प्रणव परिचारक यांची अभय मिश्रा यांच्या बरोबर रेल्वे विभागातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली, यावेळी परिचारक यांनी पंढरपूर, मंगळवेढा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील विविध विषयांवर तसेच नविन गाड्या सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश, पक्षनेतृत्व आणि आपले नेते माजी आमदार प्रशांत परिचारकांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली आहे. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला तीन राज्यांचा विस्तार असणाऱ्या केंद्राच्या मोठ्या समितीवर काम करायची संधी मिळणे, ही संधी माझ्या सर्वसामान्य जिवाभावाच्या सहकारी कार्यकर्ते, मित्रांच्या शुभेच्छा आणि सदिच्छांचे फळ आहे असे मी मानतो असे प्रणव परिचारक म्हणाले.
Tags
सामाजिक वार्ता