पंढरपूर प्रतिनिधी ---
येथील नामांकित ॲडव्होकेट विजयकुमार जाधव यांची श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीवर कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड.जाधव हे पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत आहेत. या दरम्यान, अनेक गाजलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी काम पाहिले. याबरोबरच महसूल विभागासह, प्राधिकरण, शासकीय कार्यालये व विविध राष्ट्रीयकृत बँकांचे पॅनल ॲडव्होकेट म्हणूनही ते काम पाहत आहेत. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीची अनेक प्रकरणे जिल्हा न्यायालयात सुरू आहेत. त्यामध्ये कसलाही मोदबला न घेता केवळ श्रद्धा आणि सेवा म्हणून समितीच्या वतीने कामकाज पाहण्याची इच्छा ॲड.जाधव यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मंदिर समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव पारित करून त्यांची नियुक्त केली.
यावेळी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारे अधिकारी राजेंद्ग शेळके व इतर सदस्य उपस्थित होते. मंदिर समितीचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी ॲड.जाधव यांना नियुक्तीचे पत्र दिले.
--
Tags
सहकार्य वार्ता