पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस पंढरपुरात विविध सामाजिक उपक्रम राबविन्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान संस्थापक
शेखर(बंटी)भारत भोसले यांच्या वतीने करण्यात आले होते.१० जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ.बी के धोत्रे, डॉ. संजय देशमुख, डॉ. विशाल फडे, डॉ.महेश सूडके यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. यामध्ये ११२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला,११ जानेवारी रोजी तारखेला पाळीव प्राण्यांचे आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती चेअरमन संजय मालक आवताडे, ॲड. दिनेश भोसले हे होते. यामध्ये ९८ डॉग व कॅट प्रेमींनी सहभाग नोंदवला तर १२ जानेवारी रोजी सकाळी प्रतिमा पूजन सौ.सीमाताई परिचारक, सौ. साधनाताई भोसले, सौ.अनिता पवार, सौ. श्रद्धा भोसले व अनेक जिजाऊंच्या लेकी व प्रेमींनी उपस्थित होते.
तसेच प्रतिमा पूजन झाल्यानंतर रांगोळी स्पर्धा व राजमाता जिजाऊ जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती नागेश भोसले, नानासाहेब कदम, कुलदीप पवार, सिद्धार्थ गुरव ,गणेश निंबाळकर, संदेश ढेरे संजय धोकटे, गणेश भोसले, सोपानकाका देशमुख, सागर कदम, गणेश जाधव, ओंकार चव्हाण, चैतन्य क्षीरसागर, माऊली कुलकर्णी, श्रीपाद भादुले , गौरव घाटे, तुकाराम खंदारे, दीपक राऊळ, सचिन माने,श्रीकांत कोले, नामदेव माने, शिवराज जुमाळे, आकाश पवार, रोहन भोसले, आदित्य जाधव आणि छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान संस्थापक शेखर भारत भोसले मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता