पंढरपूर प्रतिनिधी---
नाशिक येथे दि. १५ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात संशोधन आविष्कार महोत्सवात कस्तुरी कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर या महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातील पीएचडी संशोधक विद्यार्थी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशी ता. पंढरपूर या शाळेतील प्रख्यात असलेले उपक्रमशील शिक्षक सुभाष मोरेश्वर भोसले ठरले पुरस्काराचे मानकरी.
त्यांच्या आनंददायी गणित अध्ययन शारीरिक कसरती व गणित गाण्याची परिणामकारक करता या संशोधनाची फॅमिली लैंग्वेजेस अँड फाईंड आर्ट्स पी.पी.जी गटामधून महाराष्ट्रातील २४ विद्यार्थी विद्यापीठातील ४८ पदकांमधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक, ५००० हजार रु. धनादेश व दोन वर्षासाठी प्रतिवर्षी एक लाख वीस हजाराची फेलोशिप अशी पारितोषिकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे या यशाबद्दल पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे दिनांक १६ जानेवारी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा.डॉ. प्रकाश महानवर यांचे शुभ असते संशोधक सुभाष भोसले यांना अविष्कार संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. बाळकृष्ण भावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाची उपकुलगुरू प्रा.डॉ. दामा विद्यापीठ संशोधन विभागाचे संचालक प्रा. डॉ. व्ही बी पाटील विद्यापीठाचे समन्वयक डॉ. विनायक धुळे सहाय्यक उपकुलसचिव व प्रा.डॉ.शिवाजी शिंदे डॉ.ए. आर.शिंदे श्रीनिवास नलगेसि डॉ. सावंत राज्य अविष्कार स्पर्धा विजेते अशोकानंद राक्षे सर्व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.या यशाबद्दल सुभाष भोसले यांचे कासेगाव व पंढरपूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे
Tags
शैक्षणिक वार्ता