तारापूर येथे मकर संक्रांती दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम साजरा

पंढरपूर प्रतिनिधी --
मौजे तारापूर येथे दिनांक. १९/१/२०२४ रोजी २४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक  राजु (भाऊ) खरे  यांच्या पत्नी तृप्ती ताई राजु खरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
महिला ग्रामस्थ च्या वतीने तृप्ती ताई यांचा सत्कार करण्यात आला व ग्रामस्थ च्या वतीने विजू खरे यांचा सत्कार गोरख वाघमोडे (ग्रा सदस्य) व सिद्धेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

हळदी-कुंकू सारख्या समारंभामध्ये महिलांमध्ये  एकत्र येणे हे महत्त्वाचं आहे हळदी कुंकू समारंभाची परंपरा केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतभर आहे सामाजिक उद्देशाने एखादी परंपरा पुढे नेणे हा आपला सांस्कृतिक सण वारसा आहे तो पण जपायला हवा. याप्रसंगी गावातील महिला ग्रामस्थ रंगुबाई वाघमोडे (माजी सरपंच) राणी कोळी (माजी सरपंच) वैष्णवी डोळे (ग्रा सदस्य) भामाबाई सपाटे (ग्रा सदस्य) अर्चना शिंदे (ग्रा सदस्य) रेखा शिंदे (बचत गट अध्यक्ष) सविता निर्मळ (बचत गट अध्यक्ष) सुनिता चव्हाण (बचत गट अध्यक्ष) कांचन नळे .स्वाती भोई (बचत गट अध्यक्ष) शुभांगी कुलकर्णी ( बचत गट अध्यक्ष) समीरा तांबोळे (बचत गट अध्यक्ष) दिपाली मिसाळ (बचत गट अध्यक्ष) आदी मान्यवर महिला मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form