सुर्या कन्स्ट्रक्शनच्या दालनाचे मा.प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते उद्घाटन

पंढरपूर प्रतिनिधी ---
सत्यम दत्ताजीराव पाटील यांनी नवीन सुरू केलेल्या सुर्या कन्स्ट्रक्शनच्या दालनाचे उद्घाटन मा.प्रशांतराव परिचारक,
मा.कल्याणराव पाटील, नागेश भोसले यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी मा.प्रशांतराव परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दत्ता पाटील यांनी सुरूवातीच्या काळात प्रिटींग प्रेसचा व्यवसाय केला.त्यावेळी प्रिटीगची कामे हाताने करावी लागत असत,त्याकाळात छोटी मोठी कामे करून व्यवसायात आपली प्रगती दाखवून ते स्थिर स्थावर झाले वरचेवर व्यवसायात अनेक बदल होत गेले त्याप्रमाणे त्यांनी आपल्या व्यवसायात अनेक बदल केले,आधुनिक तंत्रज्ञान आले,कॉम्प्टुटर प्रिटींग आले, तात्काळ कामे होऊ लागली त्याप्रमाणे त्यांनी बदल करून प्रवाहाबरोबर आपला व्यवसायात बदल केला. डिजीटल प्रिटींग ही त्यातलाच भाग आहे तोही त्यांनी आपला मोठा मुलगा शिवम याला याच व्यवसायात आणून डिजीटल युगात पदार्पण करून पंढरपूरात याही व्यवसायाचा प्रारंभ करून दत्त डिजीटलचे नाव नांवारूपाला आणले .
पुढे बोलताना ते म्हणाले की,खरे तर आज अन्न,वस्त्र,निवारा यांची प्रत्येकाला गरज आहे. सध्या कन्स्ट्रक्शन ला फार मोठे महत्व आहे.आज पंढरपूरात अकरा मजली इमारतीला परवानगी आहे.  हीच गरज ओळखून दत्ता पाटील यांनी आपला मुलगा चि.सत्यम याला बांधकाम व्यवसायात आणले. आज प्रत्येक ठिकाणी बांधकाम क्षेत्रात अनेक बदल होत असताना अशा नवीन इंजिनिअरची गरज आहे. पंढरपूराच आता पुर्वीसारखे राहणीमान राहिले नाही. नवीन पध्दतीचे बांधकाम, अनेक नव नवीन सोयी सुविधा यांचा विचार करून आपल्याला कसे घर पाहिजे असे विचार ग्राहक करू लागले. त्याप्रमाणे नवीन इंजिनिअर आपल्या बुध्दीचा वापर करून आकर्षक बांधकाम करत आहेत. त्यात सत्यम नेही या व्यवसायात पदार्पण केले आहे. पण त्यांने या व्यवसायात तन मनाने यात प्रगती करावी ही अपेक्षा व्यक्त केली, त्यांनी ग्राहकाला काय पाहिजे यांचा पुरेपुर अभ्यास करून या क्षेत्रात आपले नाव कमवावे ही अपेक्षा व्यक्त केली. त्याला कुठेलीही अडचण आल्यास आपण त्यास सहकार्य करू असे आश्‍वासन दिले. यावेळी नागेशकाका भोसले यांनी बांधकाम व्यवसायावर आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी अनेक मान्यवरांचा यशोचित सत्कार करण्यात आला. 
    
सदर प्रसंगी नागेशकाका भोसले, नगरसेवक इब्राहीम बोहरी, मनसे नेते दिलीप बापु धोत्रे, अमर पाटील, महेश परिचारक, युवा नेेते प्रणव परिचारक, जनसेवेचे वैभव पाटील(बार्शी), शिवप्रेमीचे संस्थापक नानासाहेब कदम, ज्येष्ठ नेते दिलीपजी गुरव, नगरसेवक संजय निंबाळकर, शहरातील विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार , पंढरपूर युवा मुद्रक संघटनेचे सर्व पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंदार केसकर यांनी तरी पत्रकार भगवान वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form