२२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
पंढरपूर प्रतिनिधी ---
विठुरायाच्या चरणी अक्षता कलश ठेऊन अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले. देशभरातील साधू, संतांना आम्ही आमंत्रित करत आहोत. बाकीच्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निमंत्रित
करणार असल्याची माहिती अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास ऊर्फ आचार्य गोविंदगिरी यांनी दिली.
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात दि. २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टचे कोशाध्यक्ष किशोर व्यास ऊर्फ आचार्य गोविंदगिरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आले होते.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, माजी नगराध्यक्ष
लक्ष्मण शिरसट आदी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते किशोरजी व्यास यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर व्यास यांनी श्री रामरायाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचे आमंत्रण विविध देवी देवतांना देण्यात येत असल्याचे सांगितले. मंदिर उभारण्याचे जाहीर केल्यापासून देशभरातून ३ हजार ३०० कोटी रूपयांची देणगी गोळा झाली होती. यामधून मंदिर उभारण्यासाठी १ हजार ४०० कोटींचा खर्च होणार आहे. तरीही सतत देणग्यांचा ओय सुरूच असल्याने आज अखेर २ हजार ९०० कोटी रूपये शिल्लक असल्याचे व्यास यांनी सांगितले परदेशातून देणग्यास्वीकारण्यासाठी एफसीआरएकडे नोंद करण्याचा नियम आहे. आम्ही कोणताही नियम न मोडता फेब्रुवारी २०२३ मध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यावरच यासाठी नोंद केली आहे. आता परदेशातून देखील देणग्यांचे ओघ सुरू झाले असल्याची माहिती किशोरजी व्यास यांनी दिली.
Tags
धार्मिक वार्ता