पंढरपूर प्रतिनिधी ---
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त व पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने पंढरपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर मिष्ठान्न भोजन वाटप करण्यात आले. पत्रकार संघाच्या वतीने भरविण्यात आलेला हा मायेचा घास आमच्यासाठी लाख मोलाचा असल्याची भावना यावेळी वृद्ध माता-पित्यांनी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र पश्चिम विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, तालुका अध्यक्ष रामदास नागटिळक, शहराध्यक्ष विनोद पोतदार, नागेश आदापुरे, रवी कोळी, संजय यादव, संजय ननवरे, दादा कदम, रोहन नारसाळे, राजेंद्र फुगारे गणेश माने आदिसह संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्ध आजी आजोबांच्या तब्येतीची आपुलकीने चौकशी करून त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो असे साकडे विठुराया चरणी घातले. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमचे व्यवस्थापक धनंजय राक्षे यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags
सामाजिक वार्ता