पंढरपूर येथे १७५ रक्तदात्यांनी रक्तदान करत थर्टी फस्ट केला साजरा...

नवीन वर्षाचे स्वागत व १७५ रक्तदान त्यांनी केले सरत्या वर्षाला निरोप 
पंढरपूर  प्रतिनिधी--- 
 सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत पंढरपुरात विधायक पद्धतीने करण्यात आले. तब्बल १७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून थर्टी फर्स्ट साजरा करत नवीन वर्षाचे स्वागत केले. 

    श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपुरकर मित्रपरिवाराच्या वतीने गेल्या १९ वर्षापासून रक्तदानाची चळवळ थर्टी फर्स्ट रोजी चालवली जाते. श्याम गोगाव आणि माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या एन आय टी मित्र परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी थर्टी फर्स्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाच्याही वर्षी थर्टी फर्स्ट रोजी सकाळी नऊ वाजले पासून रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली. तब्बल १७५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांची नेत्र तपासणी देखील करण्यात आली. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह भेट देण्यात आली. 

     रक्तदान केल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील ४८ तास कुठल्याही प्रकारचे व्यसन अथवा मद्य घेता येत नाही. त्यामुळे थर्टी फर्स्ट रोजी पार्टी , डीजे , अशा गोष्टींना फाटा देत विधायक पद्धतीने व्यसनमुक्त पिढी घडवण्याचा संकल्प श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपूरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सलग गेल्या १९ वर्षापासून थर्टी फर्स्ट रोजी रक्तदानाची ही चळवळ अव्याहातपणे सुरू आहे. 

     या रक्तदान शिबिरास शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, अनिलदादा सावंत, मनसे नेते दिलीप धोत्रे, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले , विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील अशा मान्यवरांनी भेटी घेऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व श्री श्याम गोगाव, आदित्य फत्तेपूरकर, विठ्ठल कदम, बाहुबली गांधी ,महेंद्र जोशी ,धनंजय मनमाडकर, सत्यवान दहिवाडकर, गणेश पिंपळनेरकर, अमित करंडे, समीरन ताठे, गणेश जाधव, रोहन शहा, अमोल आटकळे, संतोष शिरगिरे, दत्ता पवार, विवेक पाटील, विशाल पावले आदी मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form