खर्डी येथील श्री सीताराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह

खर्डीत सीताराम महाराज पुण्यतिथी 
11 डिसेंबर रोजी 'भंडारा'
पंढरपूर प्रतिनिधी ----
सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथील श्री सीताराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह चे आयोजन केले असल्याची माहिती समाधी मंदिर ट्रस्ट यांचे वतीने देण्यात आली.दिनांक 5 रोजी हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. मानाप्रमाणे सप्ताहाचे सात दिवस केसकर(कुलकर्णी) घराण्याकडे प्रत्येकी एक दिवस पूजा नैवेद्य आरतीचा मान असतो.दिवसभर प्रवचन, कीर्तन ,रात्रभर जागर ,पारायण केले जाते.आठवडाभर मंदिर ट्रस्ट ,ग्रामस्थ तसेच भाविक यांचेकडून रोज मिष्टान्न भोजन वाटपाच्या पंगती चे आयोजन केले आहे.यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी,अध्यक्ष दीपक रोंगे,बापूसो केसकर,विकास कुलकर्णी,उमेशराव परिचारक आदी उपस्थित होते.

भंडारा हा मुख्य उत्सव 

दिनांक 11 डिसेंबर रोजी कार्तिक वद्य त्रयोदशीला पुण्यतिथी उत्सव म्हणजे भंडारा साजरा केला जातो. श्रींच्या समाधीवर दुपारी 12 वा पुष्पवर्षाव केला जातो.आरती व महाप्रसाद वाटप केले जाते.त्यानंतर पालखीचे मिरवणूक होते.राज्याबरोबरच कर्नाटक ,गुजरात,आंध्र प्रदेश आदी भागातून भाविक हजेरी लावतात.
या यात्रा कालावधी साठी ग्रामपंचायत खर्डी च्या वतीने सर्व तयारी स्वछता
पाणीपुरवठा,लाईट,पार्किंग सज्ज असल्याची माहिती सरपंच मनीषा सव्वाशे यांनी दिली .यात्रा कालावधीत वाहन गावात येऊ न देता बाहेरून जाण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.याकरिता उपसरपंच शरद रोंगे व सर्व सदस्यांबरोबर ग्रामसेवक बी व्ही कुलकर्णी ,अण्णा कावरे ,लिपिक बंडूलाल पठाण ,प्रभू गायकवाड, आदी परिश्रम घेत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form