श्रीराम जन्मभूमी न्यासपंढरपूरात अक्षता कलश भव्य शोभा यात्रा

पंढरपूर प्रतिनिधी ---
श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिरामध्ये होणाऱ्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवेळी ज्या संकल्प द्वारे जलाभिषेक केला जाणार आहे असा कलश देशभरात सर्वत्र राम भक्तांच्या भेटीला आलेला आहे. पंढरपूर मध्ये या कलशाची शोभायात्रा काढण्यात आली टिळक स्मारक मैदान पासून शिवाजी चौक ,भादुले चौक, नाथ चौक, महाद्वार चौक, कालिकादेवी चौक ,काळा मारुती ते चौफळा या मार्गाने ही शोभायात्रा काढण्यात आली .
यावेळी पंढरपूर तालुक्यातील सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ,विश्व हिंदू परिषदेचे ,बजरंग दलाचे, तसेच सर्व राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी पारंपरिक वेशभूषेत हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. शाळकरी मुलांनी लाठ्या-काठ्यांच्या, तलवारीच्या कसरतीने पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेतले शेकडो महिला देखील यात सहभागी झालेल्या होत्या .श्रीराम मंदिर निर्माण अक्षता आणि हा कलश गावोगावच्या मंदिरात पाठविला जाणार असल्याची माहिती योगेश कुलकर्णी यांनी दिली यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक युवा नेते प्रणव परिचारक,प्रशांत सापनेकर, अभय इंचगावकर,शिरीष कटेकर, श्रीकांत हरिदास,ऋषिकेश उत्पात, गणेश लंके मंदार केसकर,मैत्रेयी केसकर,भाग्यश्री लिहिणे, भास्कर जाधव, सुभाष मस्के माऊली हळवणकर सतीश मुळे ,पांडुरंग घंटी, लक्ष्मण शिरसटसह हजारो स्वयंसेवक उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form