राजू खरे यांचेकडून महिलांना व्यवसायासाठीही मदत

पंढरपूर--प्रतिनीधी
मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे  संभाव्य उमेदवार व उद्योजक राजु खरे यांच्या माध्यमातून व स्वखर्चातुन मागेल त्याला रस्ते व मागेल त्याला पाणी ही संकल्पना राबवत असतानाच, या महिलांना व्यवसायासाठी आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठी शिलाई मशीन आणि सायकल वाटप केले आहे.
 समाजात अनेक प्रकारची अडीअडचणी असल्याच्या कारणाने राजू खरे हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून मदत करीत असल्याचे दिसून येते.आता पुन्हा राजू खरे यांच्या माध्यमातून  महिलांच्या  हाताला काम मिळावे .त्यांच्या कुटुंबातील महिलांना व सदस्यांना रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता पुढाकार घेतला जात आहे.
    
  मोहोळ तालुक्यातील येणकी  गावातून या प्रोत्साहन कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. या .शिलाई मशीनचे वाटप खरे यांच्या पत्नी सौ.तृप्ती (ताई) खरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच यावेळी येणकी या गावात शालेय विद्यार्थीनींना मोफत 3 सायकलचेही वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाप्रसंगी गावातील समस्त महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,मुळातच राजू खरे हे संवेदनशील असल्याचे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्यातून दिसून येते,जर अश्या दानत असलेल्या व्यक्तींनी किंवा नेत्यांनी अशी संवेदनशीलता दाखविली तर गरजू व गरीब महिलांची आर्थिक प्रश्न व शाळेतील मुलींचे शिक्षण अधिकच सुसह्य होईल यात मात्र शंका नाही,राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यासाठी अनेक प्रश्नाबाबत खारीचा वाटा उचलले, विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील येणकी हे खेडं,केवळ शाळेत जाण्याची सोय नसल्याच्या कारणावरून अनेक मुलींनी शाळा सोडले असल्याचे बाब समोर येताच काही मुलींची निवड करून 3 मुलींना शिक्षणासाठी सायकल भेट देण्यात आली,तर गावातील अनेक महिलांनी अनेक प्रश्न मांडण्यात आले, तर यावेळी तृप्ती ताई खरे यांनी आपले विचार मांडत एकप्रकारे आपल्यामध्ये असलेल्या समाजकार्याची भावना व्यक्त केले गेले,तर काही महिलांनी प्रतिक्रिया  खरे परिवाराचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form