देगावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी झाकीर शेख यांची निवड...

पंढरपूर प्रतिनिधी:----
देगाव ता.पंढरपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी  झाकीर शेख यांची निवड करण्यात आली आहे. काल देगाव येथे पार पडलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली आहे.या पूर्वीचे अध्यक्ष  सुरेश घाडगे यांनी आपला एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागेवर काल देगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये झाकीर शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या निवडी वेळी देगावचे सरपंच समाधान घाडगे, उपसरपंच समाधान भोई ,माजी सरपंच संजय घाडगे,ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र घाडगे,सदस्य समीर शेख, सदस्य पप्पू खरात,सदस्य सुभाष घाडगे, सदस्य आनंद पाटील, सदस्य कैलास वायदंडे, सदस्य बाळू वायदंडे ,ग्रामसेवक श्री महादेव भुसे,काका पाटील, पांडुरंग वाघमारे, विलास शिंदे,हनुमंत चव्हाण,मल्हारी चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीबद्दल संपूर्ण देगाव गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form