राजाराम शिक्षण संकुल पंढरपूर छत्रपती शिवाजी हायस्कूल व राजाराम इंग्लिश स्कूल मातृ प्राथमिक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार डे उपक्रम संपन्न ...

पंढरपूर प्रतिनिधी-- 
राजाराम शिक्षण संकुल पंढरपूर संचालित मातृ मंदिर प्राथमिक राजाराम इंग्लिश स्कूल छत्रपती शिवाजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी बाजार डे हा उपक्रम प्रत्येक वर्षी साजरा केला जातो
    या कार्यक्रमाचे उद्घाटन मा श्री राजेंद्र कोरके पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या शुभहस्ते मा श्री रामदास नागटिळक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पंढरपूर तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री अँड अरविंद जाधव प्राचार्य सौ रजनी अरविंद जाधव तसेच सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते
    ‌ विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करून विरंगुळा मेळावा यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी बाजार डे मेळाव्याचे दरवर्षी आयोजन केले जाते अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद जाधव व राजाराम इंग्लिश स्कूल पंढरपूर प्राचार्य सौ रजनी अरविंद जाधव यांनी दिली 

 या बाजार डे मध्ये एकूण 60  विविध प्रकारचे  स्टॉल विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी लावण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, स्नॅक्सचे, दुकान जनरल स्टोअर्स, दुकान तसेच इतर विविध प्रकारचे दुकाने लावण्यात आली होती 

या आनंद सोहळ्यात विद्यार्थीसह, पालक विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी खरेदीचा सर्वांनी आनंद घेतला.तसेच मिळाव्यात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट चटकदार खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लावून पदार्थांची विक्री खरेदी केली तसेच खाण्याचा आस्वाद घेण्याचा आनंद विद्यार्थी पालक विद्यार्थिनींनी लुटला व हा बाजार डे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या बाजारडे बाजार डे मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री अँड अरविंद जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form