अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर परिसरात अकलूज फेस्टिवलचे आयोजन.*

अकलूज दि.१४ (प्रतिनिधी)
सहकार महर्षी कै.शंकररावजी मोहिते पाटील यांचा विचारांचा वारसा जपणारे लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे प्रेरणेने अकलूजमध्ये यावर्षी पासून "अकलूज फेस्टिवल" हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
      अकलुज हे गाव सहकार क्षेत्रा बरोबरच,संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर आहे.असंख्य कलाकार या मातीतून घडले आणि घडत आहेत.तोच सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच या फेस्टीवलच्या माध्यमातून नवीन कलाकारांना प्रोत्साहन,चालना,व्यासपीठ मिळावे या उद्देश्याने अकलुज फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे.   
            दि.२७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत अकलूज येथील धवल श्रीराम  मंदिर परिसरात सदरचे अकलूज फेस्टीवलचे  आयोजन करण्यात आले आहे.यात फॅशनेबल कपडे, गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसह खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे.लहान मुलांसाठी फनफेअर ही आयोजित करण्यात आले असून,दररोज नृत्यासह विविधरंगी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form