पंढरपूर तालुक्यात विजेच्या कडाक्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस..
पंढरपूर प्रतिनिधी-----
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, सिध्देवाडी,अनवली,तनाळी, तावशी, खर्डी,गोपाळपूर,सरकोली,चिचंबे,एकलासपूर,नेपतगाव, ग्रामीण भागातील दिवसभर उन्हाचा तडाका बसत बसताना सायंकाळी १२ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकड्या सोबत पावसाची दमदार सुरुवात होते.गेले दोन दिवसापासून पंढरपुर ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे.
गेल्या दोन दिवसापासून तापमानामध्ये चढ - उतार होत असलेले चित्र दिसत आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष, डाळिंब, व भाजीपाल्यासह अनेक पिकांना मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे हाता तोंडाशी आलेली पिके जमीनीदोस्त झाली यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने पडलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी सर्व सामान्य शेतकरी वर्गातून होत आहे.
Tags
शेतकरी वारू