महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीचे काम बंद आंदोलन
पंढरपूर प्रतिनिधी ---
महावीतरणमधील वायरम कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देवून वारमन कर्मचार्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्तिकी वारीच्या महापुजेसाठी पंढरपूर येथे आले आसता महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समीतीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तर यावेळी वारमन कर्मचार्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती देवून वायरमन कर्मचार्यांच्या मागण्या तात्काळ सोडवण्यात याव्यात अशी मागणी केली. यावर सकारात्मकता दाखवून फडणवीस यांनी संबंधीत विभागाशी दखलपुर्वक चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
राज्यातील वायरमन कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातून मांडण्यात येणार्या मागण्यांमध्ये महावीतरण मधील वर्ग चारची नोकरीतील इंन्ट्रीपोस्ट कायम ठेवून वर्ग चारमधील शैक्षणिक आर्हता प्रप्त वायरमन कर्मचार्यांना वर्ग तीनमध्ये वर्गीकरण करण्यात यावे.त्याकरीता यापुर्वी जी पदे रद्द केली. ती पदे पुर्ववत सुरू करावीत. वायरमन कर्मचार्याचे कामाचे स्वरूप व तास निश्चीत करण्यात यावे. मागील पगारवाढ करारामध्ये नमुद असलेप्रमाणे फरकासह वाढीव पेट्रोल भत्ता वीस लिटर देण्यात यावा. वायरमन कर्मचार्यांना स्वतंत्र वेतनश्रेणी द्यावी. वीज बील वसूली हे सांघीक काम असल्याने जबाबदारी निश्चित करावी. सुरक्षीत साधने व लाईट मेंटनंन्स साहित्य द्यावे. कंत्राटी पध्दतीने नोकरभरती न करता सरळ सेवा पध्दतीने करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे.
उर्जामंत्री फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना महाराष्ट्र राज्य लाईन स्टाफ बचाव समितीचे सदस्य ज्योतीराम रणदिवे, महावीर जाधव, उमेश चव्हाण, अनंत टोपडे, गजानन राऊत, राजकुमार काळे, आरिफ शेख, समीर मुलाणी, अखिल मुजावर, अनिल कोळी, मोहन मोटे, संदीप आयरे, संभाजी रोकडे, महेश कोतवाल, गणेश रणदिवे, संतोष काशीद , कैलास पिंपळेे, सिताराम लोखंडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता