पंढरपूर (प्रतिनिधी):
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या पंढरपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी समाजोपयोगी शिबीरांचे आयोजन केले असून पंढरपूर येथे श्री संत फरताळे दिंडी क्र ९ भक्त मंगल कार्यालय, संत गाडगेबाबा चौक,भक्ती मार्ग या भव्य रक्तदान शिबीरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे
Tags
सामाजिक वार्ता