स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने ॲम्बुलन्स लोकर्पण सोहळा रविवारी

महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवा सुरू 
पंढरपूर प्रतिनिधी ---
श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगद्गुरुरामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व प पु. श्री कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने ॲम्बुलन्स  लोकर्पण सोहळा रविवारी   दि.19/11/2023 रोजी दुपारी 2:00 वाजता आढीव ता. पंढरपूर जि सोलापूर  या ठिकाणी अपघातग्रस्तांना मोफत मदतीसाठी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने (रत्नागिरी, नाणीज ))ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
   
जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या सामाजिक उपक्रम अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामधे सन 2016 पासून आतापर्यंत देहदान 45 + झालेलेआहेत. त्याचप्रमाणे घरघंटी, शेळ्या गाई ,शिलाई मशीन याचे मोफत वाटप करण्यात येते. सामाजिक बांधिलकी म्हणुन मोफत शिक्षण, मोफत,मोफत रक्तदान शिबीर असे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात. 
     सामाजिक उपक्रम अंतर्गत  एकूण 52 अँबुलन्स वेगवेगळ्या रोड  वरती  धावत  आहेत. त्यापैकीच  एक अँबुलन्स दि.१९/११/२०२३ लोकअर्पण  होत आहे.या कार्यक्रमासाठी पंढरपुर तालुका तहसीलदार श्री.सुशीलकुमार बेल्हेकर साहेब, गटविकास अधिकारी  श्री. प्रशांत काळे साहेब, तालुका  आरोग्य अधिकारी  एकनाथ बोधले,वैद्यकीय अधीक्षक जयश्री  आखाडे,गवळी  मॅडम, तसेच  मुख्य पीठ नाणीजधाम अँबुलन्स   प्रमुख कमलाकर  हजारे, पाश्चिम पीठ  प्रमुख  गाडेकर, सोलापूर  जिल्हा निरीक्षक  दादासाहेब मते साहेब. जिल्हा  अध्यक्ष शरद मते  तसेच आढीव गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच सदस्य, ग्रामसेवक,ग्रामस्थ  आणि सोलापूर जिल्ह्यातील स्व-स्वरुप संप्रदायातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सेवा केंद्र पदाधिकारी, आरती केंद्र पदाधिकारी, महिला सेना युवा सेना,संग्राम सेना भाविक आणि भक्त यांनी   आढीव येथे उपस्थित रहावे असे आवाहन पंढरपुर तालुका  सेवा समितीच्या  वतीने करण्यात येतआहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form