अजनसोंड गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी शशिकांत पाटील यांची निवड


पंढरपूर/प्रतिनिधी 
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे सरपंच व ग्रामसेवक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा भरवण्यात आली. 
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष म्हणून मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांचे निवड करण्यात आली. 
यावेळी अजनसोंड गावच्या सरपंच वर्षाताई समाधान डुबल, ग्रामसेवक मॅडम, पोलीस पाटील मेघा समाधान घाडगे, अंगणवाडी सेविका डबल मॅडम, गावाचे तलाठी भाऊसाहेब गोरे, माजी डेप्युटी सरपंच तानाजी शिरगिरे, संजय सोनटक्के, माजी सरपंच एकनाथ डुबल, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ घाडगे, नागनाथ शिरगिरे, परमेश्वर डुबल, दादा डूबल, प्रफुल डुबल, निलेश घाडगे, हरिभाऊ घाडगे, कुमार काळे, बाळा पाटील, शिवाजी पाटील, भाऊ शिरगिरे यांच्या ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form