भीमाच्या पहिल्या ११ साखर पोती पूजनाचा

मोहोळ (प्रतिनिधी) - 
भीमा सहकारी साखर कारखाना लि- टाकळी सिकंदर ता-मोहोळ जि- सोलापूर येथे चालु गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोती पूजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी कारखाना कार्यस्थळावर सकाळी चेअरमन विश्वराज महाडिक यांचे प्रमुख उपस्थितीत पुळुज गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक यांचे शुभहस्ते संपन्न झाला. महत्वाचं म्हणजे १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतरच बुधवारी हा साखर पूजन कार्यक्रम घेण्यात आला.
गळीत हंगाम २०२३-२४ शुभारंभावेळी काटा पेमेंट करण्याचा दिलेला शब्द पाळत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सभासदांना केंद्रस्थानी मानूनच काम करत आहोत हे आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

दरम्यान दरवर्षी साधारणतः हंगामाच्या दुसऱ्या दिवशी साखर पोती पूजन कार्यक्रम घेतला जायचा. या परंपरेला फाटा देत "आधी लगीन कोंढाण्याचे..." याप्रमाणे  अगोदर शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल आणि मग साखर पूजन हि भूमिका चेअरमन विश्वराज महाडिक यांनी घेतली. चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सर्व सभासद शेतकरी, तोडणी व वाहतूक कामगार आणि सर्व कारखाना कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचं आवाहन केलं. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यमान संचालक मंडळ, कार्यकारी संचालक शिंदे साहेब,अधिकारी, कर्मचारी,सभासद,शेतकरी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form