पंढरीतील महाआरोग्य शिबिराचे संत महाराजांच्या मंडळी यांच्या हस्ते उद्घाटन

सावंत बंधू यांनी वारकर्यांच्या आरोग्य सेवेबाबत घेतलेल्या या उपक्रमांचे कौतुक
पंढरपूर प्रतिनिधी ---
कार्तिक वारीसाठी पंढरीत येणार्या लाखो भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत , शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे महाआरोग्य शिबीर भरवण्यात आले आहे. आज बुधवारी ६५ एकर येथे संत महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहीनीनाथ महाराज औसेकर, हभप जयवंत महाराज बोधले, शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, भैरवनाथ शुगर्सचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, यांच्यासह जिल्हा व तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी, डाॅक्टर यांच्या उपस्थित या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत म्हणाले कि, ज्या पध्दतीने आषाढी सोहळयामध्ये सुविधायुक्त आरोग्य शिबीर राबवण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे आरोग्य शिबीर राबवण्यात आले आहे. यामध्ये विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार असून जवळपास सर्वच आरोग्य तपासण्यांचा यामध्ये समावेश आहे. भाविकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा. यंदाही लाखो भाविकांची आरोग्य तपासणी करण्याचा आमचा मानस आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी मंदिर समितीचे गहीनीनाथ महाराज औसेकर, हभप जयवंत महाराज बोधले, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून या आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे महत्व सांगुन वारकर्यांनी आरोग्य शिबीराबाबत माहिती दिली. तसेच सावंत बंधू यांनी वारकर्यांच्या आरोग्य सेवेबाबत घेतलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले.
उद्घाटनानंतर आरोग्य तपासणीस सुरूवात होवून पहील्या दिवशी हजारो भाविकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form