वेणुनगर प्रतिनिधी ---
पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे संस्थापक चेअरमन व माजी आमदार कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांची १०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपुर्वक पुजा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूरचे माजी प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे
माजी सचिव डॉ. जे.जी. जाधवसर, कारखान्याचे जेष्ठ सभासद मधुकर नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी
उपसभापती बाळासाहेब पाटील, विठ्ठल हॉस्पीटलचे सचिव अभिजीत राजाराम पाटील यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, रणजित राजाराम पाटील व सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत सपन्न झाला.
याप्रसंगी आमदार रोहितदादा पवार यांचे वडील श्री राजेंद्र पवार यांनीही आवर्जून उपस्थित राहून कर्मवीर कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली.
कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे १०० व्या जयंतीनिमित्त कारखान्यामध्ये उत्पादानाशी निगडीत अखंड प्रामाणिकपणे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सेवकांचा प्रातिनिधीक स्वरुपात गुणगौरव सन्मान चिन्ह व मानधन देवून उपस्थितांच्या शुभहस्ते गौरव करणेत आला व यापुढेही कै.आण्णांच्या जयंतीच्या वेळी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार म्हणून गौरव करणेत येईल, असे श्री अभिजीतआबा पाटील यांनी सांगीतले.
स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्केसर यांनी केले तर कारखान्याचे संचालक दिनकरदाजी चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सुत्रसंचलन श्री चव्हाणसर यांनी केले.तर
सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले,कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी,अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के, धनाजी खरात, सचिन शिंदे-पाटील, तानाजी बागल, उमेश
मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, प्र. कार्यकारी संचालक डी. आर.गायकवाड,एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य व त्यांचा स्टाफ तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कर्मवीर औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांनाआदरांजली वाहिली.
Tags
सहकार वार्ता