अनेक कलावंतांनी केली आपली कला सादर आणि लुटला मन मोहक आनंद....
पंढरपूर प्रतिनिधी ---
५ नोव्हेंबर हा जागतिक मराठी रंगभूमी दिन याचे अवचित साधुन पंढरपूर येथील कलावंत आणि पंढरपूर नाट्य परिषद शाखा यांच्या वतीने अतिशय उत्साहात आणि आनंदात विवेक वर्धिनी प्राथमिक विद्यालयाच्या पटांगणावर विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी पंढरपूरातील कलावंतांनी बहारदार सादरीकरण करण्यात आले यामध्ये राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी , जेष्ठ रंगकर्मी विनय बडवे , नाट्य परिषद पंढरपूर चे अध्यक्ष डाॅ. मंदार सोनवणे , अ. भा. नाट्य परिषद नियामक सदस्य दिलीप कोरके , लावणीकार छबूराव ऊत्पात , विनोद शेंडगे , राजूभाऊ उराडे यांच्यासह पंढरपूरातील जेष्ठ व नवोदित कलाकारांनी आपल्या विविध कला गुणांनाचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित सन्मानीय कलाकार
तात्या देवकते , दत्तात्रय जगताप, प्राजक्ता बेणारे , रविंद्र शेवडे , अल्फिया मुलाणी , सिमा माने आदींनी गीत गायन करून वातावरण सुरेल बनवले तर विनय महाराज बडवे , गणेश गोडबोले , श्याम सावजी , सौ. पद्मा सावजी ,अभिनेत्री निर्मला भिंगे
आदींनी अभिनय सादरीकरण केले. छबूराव उत्पात यांनी लावणी गायन करून तर चंदाताई तिवाडी यांनी काव्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. हरि बरंगुळे यांनी भन्नाट लावणी सादरीकरण करून रसिकांना अक्षरशः नाचायला लावले. संध्या साखी यांनी भारूड सादर केले. श्री अकॅडमीतर्फे नृत्य सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी विनोद शेंडगे यांना कलारंजनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी
भैया फुगारे , परशुराम पवार,अभि गोडबोले आदींसह इतरांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.तर पंढरपूर कलाप्रेमी जेष्ठ, नवोदित कलाकार, नागरिक सहभागी होते.
Tags
कलावंत वार्ता