पंढरपूर प्रतिनिधी---
मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहे. कार्तिकी यात्रेत प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापुजा होत असते परंतु पंढरपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काही दिवसापुर्वी मंदीर समितीस निवेदनाद्वारे यावर्षीची शासकीय महापुजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते न करता वारकरी यांच्या हस्ते करावी अशी मागणी केली होती. परंतु पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने कार्तिकी यात्रे निमित्त लाखो भाविक येतात. यामध्ये सर्व समाजातील भाविक असतात. सकल समाजाच्या वतीने कार्तीक यात्रेची विठ्ठल रूक्मिणीची महापुजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात यावी यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री आले तरी एकाने विठ्ठलाची व एकाने रूक्मिणीची महापुजा केली तरी आम्हाला आनंद आहे असे पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन या पुजेस सकल मराठा समाजाचा विरोध नसल्याचे सांगितले.
सकल मराठा समाजाने राज्य शासनाच्या दोन्ही उपमुख्यमंत्री कार्तिकी रात्रेची शासकीय महापूजा करावी, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष व सकल मराठा समाजाचे नेते नागेश भोसले व दीपक वाडदेकरानीं सांगितली. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील रांनी 24 डिसेंबरपर्रंत कुठलेही उग्र आंदोलन करू नरे तसेच कुठल्राही मंत्र्रांना अडवू नरे, गावबंदी करू नरे, अशा सूचना दिल्या असल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विनोद लटके, सुमीत शिंदे, संतोष कवडे, दत्ता काळे, भास्कर जगताप आदी उपस्थित होते.
Tags
पंढरपूर वार्ता