रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदी अभिजित पाटलांची निवड…

पंढरपूर प्रतिनिधी ---
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यावर  सोपवला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदीचा पदभार 

अभिजित पाटील यांचा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे.शरद पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. मात्र, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि खासदारांना शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेवर काम करण्याची संधी दिली होती.मात्र, पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांना या संस्थेवर काम करण्याची संधी आता देण्यात येत आहे.
या अनुषंगानेच अभिजित पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदी निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे, तर अभिजित पाटलांना नव्याने उदयास आलेले साखर सम्राट म्हणून ओळखलं जातं.
काही महिन्यांपूर्वीच अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर शरद पवारांनी थेट आमदारकीच्या तिकिटाचे स्पष्ट संकेत पाटलांना दिले होते.
अभिजित पाटलांनी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांना मात दिली. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर अभिजित पाटील यांचे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात महत्त्व वाढलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form