आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त इसबावी येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे महापूजा

पंढरपूर प्रतिनिधी ----

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल....
करावा विठ्ठल जीवभाव....

प्रत्येक वारकऱ्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पांडुरंग आणि एकादशीचा उत्सव.. 
याच एकादशीच्या प्रारंभी व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार समाधानदादा आवताडे यांच्यावाढदिवसानिमित्त पंढरपूर इसबावी येथील  नागरिकांनी आज कार्तिकी एकादशी निमित्त इसबावी येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे महापूजा करून आरती केली.
पांडुरंगा मायबापा, अनेक दुःखे, संकटे सगळ्याला बाजूला करून तू भक्तांच्या आनंदाचे सौख्याचे दिवस आणतो त्याच प्रकारे लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे हे मनी बाळगत जनतेच्या सेवेस कायम तत्पर असणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांना  दीर्घायुष्य लाभावे आणि  निरंतर जनतेच्या सेवेस त्यांचे जिवन रहावे ,सुख-समृद्धी मिळावी हीच प्रार्थना या जनतेने आज पुजा करून केली
धन्य आम्ही जन्मा आलो!
दास विठोबाचे झालो!!

यावेळी भारत पाटील आणि राजमती पाटील यांच्या हस्ते तुळशी पूजा करण्यात आली.
यावेळी उपस्थित  सचिन ( दादा ) साबळे, आप्पासाहेब जाधव, अनिता ( ताई ) पवार, ओंकार वाघमारे, आनंद काळे, विकी शिंदे, विनायक डुरे, प्रशांत आराध्ये,काशिनाथ थिटे ( भाजपा जिल्हाकार्यकारणी सद्यस ), सौरभ थिटे, अभिमान मोरे,संदीप ( आबा ) पाटील.
आणि इसबावी मधील आमदार समाधान ( दादा ) आवतडे स्नेह परिवार उपस्थितीत होता.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form