मोहोळ तालुक्यातील खवणी गावचे सुपुत्र तेजस बोबडे यांचा भारत बिझनेस अवॉर्डने सन्मान..

तेजसच्या तेजस्वी कार्याची इंडिया लाइव्हने घेतली दखल 
पंढरपूर/ प्रतिनिधी
भारत बिझनेस अवार्ड २०२३ पुरस्कारने खवणी येथील तेजस दत्तात्रय बोबडे यांचा सन्मान गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या न्यूज इंडिया लाईव्हच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेजस बोबडे यांना प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

अतिशय छोट्या व दुष्काळी भागातील तेजस बोबडे यांनी एक स्वामिनी ऍग्रोटेक नावाची आदर्शवत कंपनी उभा करून कृषी क्षेत्रात पाऊल टाकले अनेक तरुण युवकांना रोजगार व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत केली. कंपनी अल्पावधीतच नावारूपास आणली,त्यांच्या या कार्याची दखल घेत इंडिया लाईव्ह न्यूजच्या वतीने भारत बिजनेस अवॉर्ड पुरस्कार बोबडे यांना देण्यात आला.
मोहोळ शहरांपासून अगदी १० किलोमीटर अंतरावर असलेलं खवणी गाव तसं दुष्काळी भागातील गांव म्हणून ओळखले जाते जेमतेम दिड हजारापर्यन्त लोकसंख्या असलेल गाव पण सध्या बोबडे यांच्यामुळे हे गाव आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे.

सध्या तेजस बोबडे हे गावचे उपसरपंच असून त्यांनी राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम,तर  २०११ साली कृषी विभागात कृषी तज्ञ म्हणून कार्यरत होते. यानंतर त्यांनी व्यवसाय उद्योगात झेप घेत विविध प्रकारचे उद्योग उभारले यामध्ये उत्कृष्ट शेतीचे नियोजन करत आधुनिक पद्धतीचे ट्रॅक्टरचे उपकरणे वापरून नवनवीन प्रयोग शेतीत राबविले, सध्या तेजस बोबडे यांचे बोबडे हायटेक नर्सरी, तेजस डेव्हलपर अँड कन्स्ट्रक्शन,जगदंबा फायनान्स, दत्तसिंधू वॉटर सप्लाय, दत्तसिंधू फार्म, स्वामिनी जनकल्याण निधी लिमिटेड अशा एक ना अनेक विविध माध्यमातून बेरोजगार तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यात आले.

तर तेजस बोबडे यांना राज्यस्तरीय आदर्श रोपवाटिका पुरस्कार, भारत बिजनेस अवॉर्ड,अशाप्रकारे एक ना अनेक पुरस्कार या आधीही भेटले आहेत .सध्या तेजस बोबडे हे शालेय शिक्षण समितीचे, जगदंबा नक्षत्र मंडळाचे, छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ व खवणी कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत, सामाजिक क्षेत्रासह राजकारणाबरोबर समाजकारणात प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करत असल्याचे दिसून येत आहे, सध्या मिळालेल्या या पुरस्काराने त्यांच्यावर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form