श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला राष्ट्रीय महामार्ग वरील वाहतूक कोंडी होऊ नये करिता पूर्व नियोजित नियोजन करण्याची निवेदनाद्वारे मागणी
मोहोळ प्रतिनिधी---
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 या दोन्हीतर्फा भागात अवजड वाहनाची दाटी निर्माण झाल्यामुळे मोहोळ शहरातील नागरिकांना दुचाकी चालक व शाळकरी विद्यार्थी यांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याची माहिती शिवसेना मोहोळ शहर प्रमुख महिला आघाडीचे अध्यक्ष मुक्ता खंदारे यांनी मोहोळचे नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोहोळ शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला या दोन्ही तर्फा वाहने प्रचंड प्रमाणात रस्त्यावर थांबली जातात व रस्त्यावर भली मोठी रांगा झाल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना या रहदारीमुळे प्रचंड त्रास होतो शिवाय एखादा अपघातातील जखमी रुग्ण उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यासाठी या रांगा झाल्यामुळे अपघातातील रुग्णांनाही धोका निर्माण होण्याची संभावना आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर वाहतूक थांबल्यामुळे या मार्गाने जाणारी अवजड वाहने मोहोळ शहरांमधून जातात ऐन दिवाळीचे सण असल्यामुळे मोहोळ शहराच्या मध्यवर्ती भागात व्यापारी व किरकोळ विक्रेते व खरेदीसाठी येणाऱ्या कुटुंबीयांना मुलाबाळांना याचा धोका होण्याची शक्यता आहे ही व्यवस्था सुरळीत करून शहराच्या मुख्य रस्त्याने अवजड वाहने प्रवेश न करता मुख्य रस्त्याने जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था पूर्वनियोजित सुरळीत करावी असेही मुक्ता खंदारे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता