निराधार आणि वयोवृद्धासोबत सूर - संगीत कार्यक्रमाने दीपावली साजरी

पंढरपूर प्रतिनिधी --
ज्येष्ठ पशु वैद्यक प्रतिष्ठान पंढरपूर यांनी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात सूर-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.विश्वासराव मोरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्राक्ष बागायतदार संघाचे संभाजी आसबे उपस्थित होते.
 
एक धागा सुखाचा अन शंभर धागे दुःखाचे अश्याच प्रकारचे जीवन जगत असणारे या वृद्धाश्रमातील माता-पित्यांना त्यांच्या या रटाळ जीवनामध्ये आनंद मिळावा या हेतूने सूर-संगीत कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ पशु वैद्यक प्रतिष्ठान चे संस्थापक डॉ.विश्वासराव मोरे यांनी  केले होते, त्याचबरोबर वृद्धाश्रमातील सर्व जेष्ठांची निष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
 
सुर-संगीतमय दिपवाली या हिंदी मराठी गाण्याच्या कार्यक्रमात भजन, लावणी भक्तिगीते,देशभक्ती गीते तसेच हिंदी-मराठी चित्रपटातील सुमधुर गाणी यावेळी सोलापूर येथील शशी बासुतकर व भाग्यश्री चव्हाण यांनी गायली,यावेळी ओवी मोरे,बाळासाहेब येलमार यांनी देखील गाणी गायली.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने प्रत्येकाचे समाजाप्रती काहीतरी देणे आहे,गोरगरीब-अनाथांना मदत करणे,शालेय गरीब विद्यार्थीना मदत करणे अश्याप्रकारे डॉ.मोरे सतत सामाजिक काम करीत आसतात त्यांच्या या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.समाजातील आश्या घटकापर्यंत आपण पोहचले पाहिजे असे मत यावेळी भाजपा वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास डॉ.विश्वासराव मोरे गायक भाग्यश्री चव्हाण व शशी बासुतकर
बाळासाहेब येलमार,वृषाली मोरे,संभाजी आसबे,डॉ.श्रीधर येलमार,सुरेश यादव,मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर चे व्यवस्थापक राक्षे साहेब आदी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form