पंढरपूर (प्रतिनिधी)
साधुसंत येती घरा,तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे,पंढरीत वंचित घडकांच्या चेहऱ्यावर दरवर्षी हास्य फुलते,त्यावेळी समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांचा वाढदिवस ठरलेला असतो.नव्हे तर हा वाढदिवसाचं वंचित घटकांच्या जीवनात खुशी आणण्यासाठी असतो.
पंढरपूर शहरातील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांचा वाढदिवस ११ नोव्हेंबर रोजी पंढरीत थाटात पार पाडला.
पंढरपूर मधील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पैसे खर्च न करता वयोवृद्ध विठ्ठल भक्तांसाठी ऑक्सिपल्स मिटर,शुगर मशीन,प्रथमउपचार पेटी,औषध व गोळ्या व मेडीकल साहित्य मंदिर समितीला भेट दिल्या आहेत.
पंढरपूर शहरात बेघर अवस्थेत राहणाऱ्या महिलांना आवश्यक असणाऱ्या सॅनेटरी पॅडचे वाटप करण्यात आले. याचवेळी लेबर कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. समाजसेविका ऐश्वर्या शिंगटे आणि सायली वाडदेकर यांच्या शुभहस्ते हे उपक्रम पार पडले.
पंढरपूर शहरातील विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातून अनेक भाविक पंढरीत येत असतात. या भाविकांमध्ये दिव्यांग भाविकांचाही समावेश असतो. मंदिरामध्ये त्यांची सोय व्हावी , याकरिता, वाढदिवसाचे औचित साधून कमलीवाले यांनी वॉकर, ग्लुकोमीटर, वजन काटा मेडिकल साहित्यही देऊ केले आहे. या साहित्याचा वापर दिव्यांग बांधवांसाठी होणार आहे. पंढरपुर मधील मदरसा येथे लहान मुलांचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.दरवर्षीच कमलीवाले यांचा वाढदिवस याच पद्धतीने साजरा करण्यात येतो. त्यांचा वाढदिवशी नेहमीच वंचित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असते, ते हास्य यावर्षीही ११ नोव्हेंबर रोजी फुलले आहे.सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले आहे.त्यामुळे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले आहेत.
Tags
सामाजिक वार्ता